Realme : रियलमी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Realme 10 Pro+ हा स्मार्टफोन देशात 8 डिसेंबर रोजी लाँच होईल, असे कंपनीने सांगितले आहे.
विशेष म्हणजे हा स्मार्टफोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 108MPचा जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर इतर भन्नाट फीचर्सही मिळणार आहे.
अपेक्षित फीचर्स
या स्मार्टफोनच्या वर आणि खाली बेझलसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या वरच्या मध्यभागी होल-पंच कटआउट असणार आहे. कंपनीचा येणारा स्मार्टफोनमध्ये 6nm MediaTek Dimensity 1080 SoC प्रोसेसर, डिस्प्ले 800 nits ब्राइटनेससह येतो.
जो 120HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAH बॅटरी पॅक करेल.कॅमेऱ्यामध्ये 108MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रोसेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा असेल. आगामी स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येत आहे.
Realme 10 Pro+ची चीनमधील किंमत
या स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये बेस 8GB+128GB स्टोरेज पर्यायासाठी CNY 1699 (अंदाजे रु. 19,400) रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB+256GB आणि 12GB+256GB स्टोरेज आहे. ज्याची किंमत CNY 1999 (अंदाजे रु. 22,900) आणि CNY 2299 (अंदाजे रु. 26,300) रुपये इतकी आहे.
भारतातील किंमत
जर तुलना करायची झाली तर Realme 9 Pro+ 5G ची भारतातील किंमत ही 6GB+128GB पर्यायासाठी 24,999 रुपये इतकी असून 8GB+128GB या मॉडेलची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 8GB+256GB स्टोरेज असणारे हे मॉडेल 28,999 रुपयांना उपलब्ध आहे.