Nothing Phone : स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! नथिंगचा फोनही झाला स्वस्त, आता मोजावे लागणार ‘इतकेच’ पैसे

Nothing Phone : मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी Nothing Phone (1) हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. तेव्हापासून तो मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अनेकांना तो आपल्याकडेही असावा असे वाटत आहे. परंतु, बजेट जास्त असल्यामुळे तो अनेकांना विकत घेता येत नाही.

तुमचे आता Nothing Phone (1) स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. नथिंग फोन (1) चा 8GB + 128GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांना मिळत आहे.

त्याशिवाय बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड EMI सह व्यवहारांवर तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळत असून तुम्ही तो 25,999 रुपयांना खरेदी करू शकता.तसेच तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केला तर 5% कॅशबॅक मिळेल.

हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून ग्लिफ इंटरफेसमुळे स्क्रीन वेळ कमी करण्यास मदत करते. 900 LED ने बनलेल्या लाईटमुळे कोण कॉल करत आहे हे समजते. तसेच यामध्ये 50MP चे दोन रियर कॅमेरे आहेत. ज्यामध्ये प्राथमिक सेन्सर सोनी IMX766 वर आधारित असून फोनमध्ये नाईट मोड आणि सीन डिटेक्शन आहे.

अर्ध्या तासात 50% पर्यंत चार्ज

यामध्ये कंपनीने 60Hz ते 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. याची स्क्रीन HDR10+ आहे जी मागे आणि समोर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 च्या लेयरसह येते. तसेच हा स्मार्टफोन मिड-रेंज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778+ ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये जलद चार्जिंग सपोर्टसह 4500 mAh बॅटरी आहे. हा फोन अर्ध्या तासात 50% पर्यंत चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.