boAt Wave Flex : स्मार्टवॉच बनवणारी दिग्ग्ज कंपनी boAt ने भारतात पुन्हा एकदा आपले धमाकेदार स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच शानदार फीचर्स सोबत येत आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचचे नाव boAt Wave Flex असे आहे. यात 1.83 इंचाचा HD डिस्प्ले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टवॉचची किंमत खूपच कमी आहे. इतकेच नाही तर तब्बल 10 दिवस या स्मार्टवॉचची बॅटरी टिकेल असा दावा कंपनीने केला आहे. boAt Wave Flex स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स निगडित सविस्तर जाणून घ्या.
कंपनीच्या boAt Wave Flex ची किंमत 1,499 रुपये आहे, आपल्या नवीन वापरकर्त्यांसाठी कंपनीने ते Active Black शिवाय चेरी ब्लॉसम आणि डीप ब्लू रंगात सादर केले आहे. हे नवीन स्मार्टवॉच तुम्हाला खरेदी करायचे असेल तर ते कंपनीच्या साइट आणि Flipkart वरून विकले जात आहे. यात 1.83-इंचाचा HD डिस्प्ले आहे. तसेच यासोबत मेटॅलिक डिझाइनही उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये त्वचेला अनुकूल सिलिकॉन पट्टा आहे.
तसेच या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी या स्मार्टवॉचमध्ये चांगला माइक आणि स्पीकर उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीचे 10 पर्यंत संपर्क सेव्ह करू शकता. बोटच्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचमध्ये व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग मिळाले आहे. तसेच हे 2 तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते.