अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोना लसीचे दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी एक सर्व राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेतली.
त्यानंतर ही माहिती देण्यात आली. देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय त्या-त्या राज्यांनी घेतला आहे. अशावेळी सर्व शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर द्यावा अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
त्यासंबंधीचे पाऊल म्हणून या आठवड्यात केंद्र सरकारने शिक्षकांच्या लसीकरणासाठी दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी एक सर्व राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेतली.
त्यानंतर ही माहिती देण्यात आली. या संबधी सर्व राज्यांतील शिक्षण विभागांशी समन्वय साधून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. देशातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी केंद्राने उचललेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं मानलं जातंय.