IRCTC Tour Package : फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी खुशखबर! IRCTC घेऊन आले आहे शानदार टूर पॅकेज, भाडे फक्त इतकेच..

IRCTC Tour Package : फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण IRCTC शानदार टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजमुळे तुम्हाला कमी किमतीत मलेशिया आणि सिंगापूरला फिरता येणार आहे.

या ठिकाणी अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ही टूर पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जाणार आहे.  याठिकाणचे समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना मोहात पाडतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हालाही या ठिकाणांना फिरायला जायचे असेल तर तुम्ही संधी हातातून जाऊ देऊ नका. देशातील अनेक जण हे पॅकेज बुक करत आहेत. हे लक्षात घ्या की हे टूर पॅकेज एकूण 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे. तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळत आहे.

एका ट्विटद्वारे आयआरसीटीसीने या पॅकेजची माहिती दिलीअसून ही टूर नवीन वर्षात 18 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. पॅकेज अंतर्गत प्रवाशांना थेट दिल्लीहून क्वालालंपूरला नेण्यात येईल.

त्यानंतर तुम्हाला सिंगापूरला नेले जाईल. तिथून तुम्हाला दिल्लीला परत आणले जाईल. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये तुम्हाला विम्याची सुविधा मिळत आहे.

त्याचबरोबर तुम्हाला जेवणाची काळजी करण्याची गरज नाही. सर्व व्यवस्था IRCTC करेल.

जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 1,35,000 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर जर तुम्ही दोन किंवा तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती भाडे रु. 1,15,000 मोजावे लागतील.