अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती खाली येत आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 239 रुपयांनी घसरून 45,568 रुपयांवर बंद झाल्या.तर चांदीही 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली.
कालही सोन्या-चांदीमध्ये घसरण झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून आला
तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची उसळी नोंदवली गेलो होती. काल सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46,379 रुपयांच्या भावावर व्यापार करत होता तर एक किलो चांदीची किंमत 69183 रुपये होती.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.