आनंदाची बातमी : सोन्याच्या दरात मोठी घसरण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 69,513 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. घोषणा केली गेली आहे.

अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात झाली. सध्या या दोन्हींवर साडेबारा टक्के आयात शुल्क द्यावं लागतं. परंतु आता या घोषणेनंतर केवळ साडेसात टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे. यामुळे याचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर पहायला मिळत आहे.

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 717 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका कमी झाला आहे. दिल्लीत 99.99 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 46,102 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. या आधीच्या सत्रात हाच भाव 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीच्या दरातही बुधवारी मोठी घसरण झाली. दिल्लीत चांदीचा भाव 1274 रुपयांनी घसरून 68239 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24