खुशखबर ! आता भारतात चौथी कोरोना प्रतिबंधक लस येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी लसीची निर्मिती करण्यात आली आहे.

झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. ही लस जगातील पहिली डीएनए बेस्ड करोना लस ठरणार आहे.

भारतात या लसीमुळे करोना लसींची संख्या चार वर जाईल. देशात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्‍सिन आणि रशियन स्पुतनिक करोना लसी वापरल्या जात असून या तिन्ही लसी डबल डोस आहेत.

ही लस निडलफ्री म्हणजे इंजेक्‍शन नको या स्वरुपाची आहे. लस देण्यासाठी जेट इंजेक्‍टरचा वापर होणार आहे. यात शरीरात सुई न घालता हाय प्रेशरने लस शरीरात घातली जाते. अमेरिकेत याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो,

तसेच युरोप आफ्रिकेत सुद्धा काही देशात त्याचा वापर होतो. या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे.

झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे. एका वर्षाला 24 कोटी डोस जेट इंजेक्टर मुळे वेदना कमी होतात शिवाय इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

झायडस कॅडिलाच्या झायकोव डी लसीच्या १२ ते १८ वयोगटावर चाचण्या सुरु झाल्या असून वर्षाला २४ कोटी डोस उत्पादन केले जाईल असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजे दर महिन्याला दोन कोटी डोस तयार केले जाणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24