अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- हवामान विभागाकडून शुक्रवारी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१० जुलैपासून राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनने सुरूवातील जोरदार हजेरी लावली अन नंतर पाऊस गायब झाला होता.
त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसने हजेरी लावल्याने हे संकट टळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बंगालच्या उपसागरावरुन कमी उंचीवरुन बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, तसेच अरबी समुद्रावरुनही येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने कोकणासह राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
येत्या २४ तासांत कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची १० ते १२ जुलै दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच १२ जुलै रोजी कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यात ऑरेंट अलर्ट दिला असून, घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.