Tvs Electric : TVS ही देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक स्कुटर्स तसेच बाईक्सना भारतीय बाजारात खूप मागणी असते. कंपनीही ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता नवनवीन फीचर्स असणाऱ्या स्कुटर्स तसेच बाईक्स लाँच करत असते.
जर तुम्हीही TVS चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता इलेक्ट्रिक सेगमेंटची तयारी करत आहे. लवकरच मार्केटमध्ये या कंपनीच्या नवनवीन फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर्स तसेच बाईक्स आपल्याला दिसतील.
सुरू आहे टीव्हीएसचीही तयारी
इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये नवीन कंपन्या सतत त्यांची उत्पादने घेऊन येत आहेत. अशातच आता देशातील आघाडीची दुचाकी कंपनी TVS कडून नवीन वाहने आणण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात कंपनी आपली अनेक वाहने सादर करू शकते आहे.
वाढला जाणार पोर्टफोलिओ
कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेक नवीन बाईक आणि स्कूटर लॉन्च करणार आहे. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या एक ते दीड वर्षात या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी आणेल. कंपनी पाच किलोवॅटपासून ते २५ किलोवॅटपर्यंतच्या पॉवरच्या स्कूटर आणि बाइक्स आणू शकते.
होणार या स्कूटरपासून सुरुवात
एका अंदाजानुसार, कंपनी येत्या दोन ते चार महिन्यांत अधिकृतपणे iCube ST भारतीय बाजारपेठेत लॉन्च करेल. यानंतर, कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ वाढवत अनेक बाइक आणि स्कूटर आणू शकते.
iQube ST कसे आहे
मागील काही दिवसांपूर्वी कंपनीने याचे अनावरण केले होते. तसेच ऑटो एक्स्पो 2023 मध्ये देखील याचे प्रदर्शन केले होते. आता लवकरच ती येणार आहे. iQube ST मध्ये कंपनीने 5.1 kWh ची बॅटरी दिली असून पूर्ण चार्ज केल्यानंतर 140 किलोमीटरपर्यंत चालवता येते. तसेच फुल चार्ज करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. कंपनीने सात इंच टच पॅनेल दिले असून ज्यात TPMS, मीटर रेकॉर्ड, स्कूटर माहिती तसेच सेवा माहिती उपलब्ध आहे. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पासवर्ड सिक्युरिटी, डॅमेज फोन नोटिफिकेशन, साइड स्टँड सिक्युरिटी यासारखे फीचर्स उपलब्ध असणार आहेत. यात 31 लीटरची बूट स्पेस आहे ज्यामध्ये पूर्ण आणि दीड आकाराचे हेल्मेट बसू शकते.