खुशखबर ! सरकारी शुल्कात उपलब्ध होणार ‘रेमडेसिवीर’ ; मंत्री गडकरींचा मोठा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-वर्धा मधील सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली.

येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी पुरविले जाईल.

असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.

वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले कि, इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती.

काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल. कोरोनाचा सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. संकट मोठे आहे. परिस्थिती आव्हानात्मक आहे.

तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे गडकरी म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24