दिलासादायक बातमी ! शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत.

त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी भुजबळ म्हणाले की सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही.

त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात मजुर, कामगार,

शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल,

रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत.

या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24