खुशखबर ! देशात केवळ ५ महिन्यात २१६ कोटी लसींचे उत्पादन होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच याला अटकाव करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

दरम्यान देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करण्यात अडचण येत आहे. कारण देशात लसीचा मोठा तुटवडा जाणवतो आहे.

दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे.

देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लस उत्पादक कंपन्यांकडून ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी २१६ कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल.

त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24