अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- देशासह राज्यातून कोरोना हळूहळू पायउतार होऊ लागला आहे. यामुळे निर्बंध देखील शिथिल करण्यात येत आहे. यातच नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
ती म्हणजे गेल्या 24 तासात श्रीरामपूर शहर व तालुक्यात नव्याने एकही नवीन करोना रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाबाधितांची भर न पडल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात ३५ करोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत होते. त्यात करोनातून ५ जणांनी काल करोनावर मात करून ते घरी गेले आहेत. त्यामुळे आता ३० रुग्ण अॅक्टीव्ह असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता ठेवली आहे. यामुळे सर्व चित्रपटगृहे चालू आहेत, तसेच शाळा महाविद्यालयेही सुरू झाले आहेत.
तसेच आता सर्व प्रकारच्या गाड्याही सुरू झाल्याने करोना पुन्हा वाढला जातो की काय अशी भीती होती. मात्र काल तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
त्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७८८२ रुग्णांना करोनाची लागण झाली होती.