PPF Scheme : खुशखबर! पीपीएफ योजनेत होणार मोठे बदल, होणार कमाईसोबतच लाखोंची गुंतवणूक

PPF Scheme : केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक अल्पबचत योजना चालवल्या जातात. त्यापैकी पीपीएफ हा अतिशय लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे.

या योजनेत तुम्ही आता घरबसल्या खाते उघडून मोठी रक्कम उभी करू शकता. त्याचबरोबर या योजनेत गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही आणि परतावाही चांगला मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेक दिवसांपासून पीपीएफ मर्यादेबाबतची मागणी होत होती, या मागणीचा विचार करून 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी मागवलेल्या सूचनांमध्ये संस्थांनी पीपीएफची मर्यादा वाढवून तीन लाख करण्याची मागणी केली होती.

अर्थसंकल्पापूर्वी सरकारला सादर करण्यात आलेल्या मेमोरँडममध्ये ICAI ने PPF मधील गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक 3 लाख रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये कमीत कमी 500 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपये इतकी आहे. ही मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाली तर याचा जनतेला मोठा फायदा होईल.

PPF योजना कर धोरणाच्या EEE श्रेणी अंतर्गत येते, ज्यामुळे मूळ रक्कम, परिपक्व रक्कम, त्याचबरोबर मिळालेले व्याज करमुक्त आहे. त्यामुळे ही योजना लोकप्रिय आहे.