खुशखबर ! जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेगा भरती होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेल्या मेगा भरती जाहिरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग

अंतर्गत 5 संवर्गांची जाहिरात मधील पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 अन्वये सुरुवात होत आहे.

फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद 7 आणि 8 ऑगस्ट 2021 ला परीक्षा होईल. परीक्षेनंतर 23 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

दिव्यांगाकरिता 4 टक्के राखीव ठेवुन सुधारीत जाहीरात दिनांक 29 जुन 2021 किंवा 30 जुन 2021 रोजी प्रसिध्द करण्यांत येणार आहे. नव्याने समाविष्ठ पदाकरिता दिव्यांग उमेदवारांना दिनांक 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 ऑनलाईन अर्ज भरता येईल.

उमेदवारास लेखी परिक्षा ओळखपत्र दिनांक 1 ऑगस्ट 2021 ते 5 ऑगस्ट 2021 पर्यंत परिक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. SEBC (मराठा) आरक्षण रद्द झाल्यामुळे पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यांत येणार आहेत.

SEBC (मराठा) आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे. त्यांनी दिनांक 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायाचा आहे किंवा आथिक द़ृष्टया मागास वर्ग प्रवर्गात (ईडब्लुएस) भरावयाचा आहे याचा विकल्प देणे आवश्यक आहे .

अन्यथा खुल्या प्रवगातून समजण्यांत येणार आहे. सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. जरी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असला तरी आता फक्त एकाच जिल्हा परिषदेची परीक्षा देता येणार.

मात्र एकाच जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज असेल तर त्या परीक्षा देता येतील. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषदेचा पर्याय निवडणे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24