खुशखबर ! सप्टेंबरमध्ये ‘ह्या’ सरकारी बँकेचा ऑफरचा वर्षाव; सगळे चार्जेस केले माफ; वाचा अन पैशांचा फायदा घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. फेस्टिव सीजनसाठी, देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्जावर ऑफरची वर्षाव करत आहे.

सर्व कर्जावर सर्विस चार्ज माफ :- पीएनबीने सर्व रिटेल कर्जावरील अनेक शुल्क माफ केले आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता कर्ज, पेन्शन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यांसारख्या उत्पादनांवर प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. एवढेच नाही तर या सर्व कर्जावर सर्व्हिस चार्ज आणि डॉक्युमेंटेशन चार्जेसही माफ करण्यात आले आहेत.

सर्वात कमी व्याज दरावर पर्सनल लोन :- पंजाब नॅशनल बँक वैयक्तिक कर्ज 8.95 टक्के दराने देत आहे. पीएनबी म्हणते की त्याचे वैयक्तिक कर्ज इंडस्ट्री मध्ये सर्वात स्वस्त आहे. पीएनबी 6.8 टक्के आकर्षक व्याज दराने गृहकर्ज देत आहे, तर कार कर्ज 7.15 टक्के दराने दिले जात आहे. पंजाब नॅशनल बँकेने याला फेस्टिवल बोनान्झा ऑफर असे नाव दिले आहे.

ऑफर्स 31 डिसेंबर पर्यंत आहेत :- या व्यतिरिक्त, बँकेने गृहकर्जावरील टॉप -अप देखील आकर्षक केले आहे, ज्यावर व्याज दर कमी असतील. या सर्व ऑफर्सचा लाभ 31 डिसेंबर 2021 पर्यंत घेता येईल. या ऑफरसाठी, ग्राहक ऑफर जाणून घेण्यासाठी बँकेच्या शाखेला भेट देण्याव्यतिरिक्त, बँकेच्या ऑनलाइन सेवा वापरू शकतात. सणासुदीच्या काळात लोक अधिक खर्च करतील, ज्यामुळे बँकेचा पतपुरवठा सुधारेल अशी आशा पीएनबीने व्यक्त केली.

PNB ने सेविंग अकाउंटयावरील व्याजदर घटवले :- जर तुमचे बचत खाते पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या बचत खात्यावर कमी व्याज मिळेल. पंजाब नॅशनल बँकेने 1 सप्टेंबरपासून बचत खात्याचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.htmlवर उपलब्ध माहितीनुसार, बचत खात्यातील व्याजदर 1 सप्टेंबरपासून कमी केले जातील.

पीएनबीने बचत खात्यांवरील व्याज दर 3 टक्क्यांवरून कमी करून 2.90 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनबीच्या या निर्णयामुळे बँकेच्या नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांवर परिणाम होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office