Fixed Deposit Rate : ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण सरकारी बँकेने त्यांच्या एफडी आणि बचत खात्यावरील व्याजात वाढ केली आहे.
पंजाब अँड सिंध या सरकारी बँकेने एफडी आणि बचत खात्यावरील व्याजात बदल केले आहेत. त्यामुळे पंजाब अँड सिंध बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
7 दिवस ते 14 दिवस – 2.80%
15 दिवस ते 30 दिवस – 2.80%
31 दिवस ते 45 दिवस – 3.00%
46 दिवस ते 90 दिवस – 4.00%
91 दिवस ते 120 दिवस – 4.20%
121 दिवस ते 150 दिवस – 4.30%
151 दिवस ते 179 दिवस – 4.30%
180 दिवस ते 269 दिवस – 4.80%
270 दिवस ते 364 दिवस – 5.00%
12 महिने ते 24 महिने- 6.10%
24 महिने 1 दिवस ते 36 महिने – 6.25%
36 महिने ते 60 महिने – 6.10%
60 महिने 1 दिवस ते 120 महिने – 6.10%
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळेल
बँकेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर अतिरिक्त 0.50% व्याज मिळत आहे. हे दर नवीन एफडी आणि नूतनीकरण करणाऱ्या एफडीवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. एनआरआय आणि एनआरओ यांना हा लाभ मिळत नाही. अलीकडेच बँकेने 5 विशेष एफडी देखील सुरू केल्या आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया एफडी दर
युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 3% ते 7% व्याज देते. 599 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7% व्याज उपलब्ध आहे.
कॅनरा बँक एफडी दर
कॅनरा बँकेने 666 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7% व्याज दर देत आहे. कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 7.5% व्याज देत आहे.