खुशखबर ! यंदा मान्सूनमध्ये मुळा धरण वेळेतच भरणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-यंदाही पाऊस समाधानकारक असून सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार आहे. यामुळे मुळा धरण वेळेतच पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

सलग तीन वर्ष दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकरी बांधवांना मागीलवर्षी चांगला पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. धो-धो पाऊस पडल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तीन वेळा धरणातून पाणी सोडण्यात आले.

यंदाही तशाच प्रकारचा पाऊस असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे मोहनराव देठे यांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या वर्षीच्या मान्सूनबाबत देठे यांनी सांगितले, यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल होणार असून 10 ते 11 जून पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु जूनमध्ये समाधानकारक पाऊस नसला तरी जुलै, ऑगष्टपासून सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत धो-धो पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्याची वार्‍याची दिशा, हवेतील आर्द्रता व तपमान याचा अभ्यास केला असता यंदाही समाधानकारक पाऊस बरसणार आहे. जून महिन्याचा अपवाद वगळता पुढे चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज देठे यांनी वर्तविला

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24