खुशखबर ! येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाला सुरूवात होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-सध्या राज्यात केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्या खाजगी आरोग्य संस्था ह्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांमध्ये सहभागी आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा अधिक ज्यांना सहव्याधी आहेत आणि ६० वर्षांपर्यंत व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी सामान्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर मान्यता दिलेल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांत येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेत मान्यता आणि आयसीयू कक्षाची सुविधा असणार्‍या 32 खासगी आणि 4 शासकीय अशा 36 ठिकाणी लसीकरण होणार आहे.

यात खासगी ठिकाणी सशुल्क तर शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत करोना लस दिली जाणार आहे. शासकीय रुग्णालयात करोना लस मोफत मिळणार आहे.

तर खासगी ठिकाणी लसीचे 150 रुपये आणि 100 रुपये सेवा शुल्क असे 250 रुपये भरावे लागणार आहे. जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी रविवारी जिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहिमेत सहभागी होणार्‍या हॉस्पिटलचे डॉक्टर,

कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासह सायंकाळी उशीरापर्यंत केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून व्हीसीद्वारे सुचना देण्याची कार्यवाही सुरू होती.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24