‘या’ झाडाची शेती बनवणार शेतकऱ्यांना मालामाल; वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : मित्रांनो भारत हा एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे मात्र पारंपारिक शेतीत सातत्याने शेतकरी बांधवांना नुकसान सहन करावे लागत आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या पारंपारिक शेती पद्धतीत (Farming Technique) शेतकरी बांधवांना अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmers Income) मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव आता नव-नवीन प्रकारच्या पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत.

विशेष म्हणजे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देतात. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे.

आज आपण देखील एका नवीन पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण महोगनी शेती (Mahogany Farming) विषयी बहुमूल्य माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

महोगणी लागवड म्हणजेचं करोडोंची कमाई
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीकपद्धतीत बदल करण्याचा विचार करत असाल तर महोगनी शेती तुमच्यासाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, जर शेतकरी बांधवांनी आपल्या एक एकर शेतजमिनीत 100 पेक्षा जास्त महोगनीची झाडे लावली तर शेतकरी बांधव अवघ्या 12 वर्षात करोडपती होऊ शकतात.

शेतकरी बांधवांना एका बिघा शेतजमिनीत याची लागवड करण्यासाठी सुमारे 40-50 हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो महोगनीचे एक झाड 20 ते 30 हजारांना विकले जाते.

अशा परिस्थितीत, शेतकरी बांधव त्यांच्या शेतात मोठ्या स्तरावर महोगणीची शेती सुरु करून करोडो रुपये कमवू शकतात. विशेष म्हणजे आपल्या देशात अलीकडे महोगनीची लागवड झपाट्याने वाढत आहे.

याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होत आहे. महोगणी मध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने बाजारात याला मोठी मागणी असून याच्या लाकडाच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत.

महोगनी शेतीसाठी अनुकूल हवामान नेमकं कोणतं
शेतकरी मित्रांनो जर आपण महोगनी शेती सुरू करू इच्छित असाल तर आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याच्या शेतीसाठी उत्तर भारतातील तापमान सर्वोत्तम असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक स्पष्ट करतात.

मात्र, असे असले तरी आपल्या देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही महोगणी शेती केली जाऊ लागली आहे. तसेच आता दक्षिणेत देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव याच्या शेतीतून चांगली मोठी कमाई करू लागले आहेत.

महोगणी लागवडीसाठी उपयुक्त शेतजमीन
आज शेतकरी बांधव शेती क्षेत्रात काळाच्या ओघात मोठा बदल करत आहे. यामध्ये प्रामुख्याने पीक पद्धतीत बदल केला जात आहे. आता शेतकरी बांधव महोगणी शेतीकडे आपला मोर्चा वळवत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

याच्या शेतीसाठी चिकणमाती असलेली शेतजमीन ही सर्वात योग्य मानली जाते. मात्र असे असले तरी कृषी तज्ञांच्या मते, याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सहज करता येते आणि याच्या शेतीतून चांगली बक्कळ कमाई करता येते. या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची शेती बर्फाळ प्रदेश वगळता कोणत्याही हवामानात केली जाते. याच्या झाडाची लांबी 40 ते 200 फूटपर्यंत असू शकते.

याच्या शेतीची विशेषता
या झाडाला इतर झाडांच्या तुलनेत फारच कमी काळजी घ्यावी लागते. शिवाय, या झाडाला खूप कमी पाणी लागते. उन्हाळ्यात प्रत्येक आठवड्यात दोन वेळा पाणी द्यावे. पण नंतर तेवढ्या पाण्याचीही गरज भासत नाही. या झाडाला वसंत ऋतु किंवा पावसाळ्यात पाणी लागत नाही.