Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Google Chrome : वापरकर्त्यांनो सावधान! त्वरित अपडेट करा क्रोम, नाहीतर तुम्हाला सहन करावे लागणार मोठे नुकसान

जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण गुगलने वापरकर्त्यांना एक इशारा दिला आहे.

Google Chrome : देशभरात गुगल क्रोम वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण गुगल क्रोम या वेब ब्राउझर सर्वात जास्त वापर करत असतात. कोणतीही माहिती शोधायची असेल तर आपण लगेच या वेब ब्राउझरची मदत घेतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल यात सतत नवनवीन अपडेट आणत असते. जर तुम्हीही गुगल क्रोम वापर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता गुगलने आपल्या वापरकर्त्यांना एक इशारा दिला आहे. तुम्ही वापरत असलेले गुगल क्रोम तुम्हाला अपडेट करावे लागणार आहे.

सध्या Google ला Chrome ब्राउझरमध्ये दोन सुरक्षा दोष आढळून आले असून त्यांनी बगची कबुली देत ​​असे म्हटले आहे की Google ला माहिती आहे की CVE-2023-2033 मध्ये एक बगअस्तित्वात आहे. गुगलच्याच थ्रेट अॅनालिसिस या ग्रुपने बग ओळखला आहे. Google ने ही सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी नवीन Chrome अपडेट जारी करण्यात आले आहे त्यामुळे आता वापरकर्त्यांनी लवकरात लवकर त्यांचे ब्राउझर अपडेट करावे.

ब्राउझर अपडेट करणे का गरजेचे आहे?

जर वापरकर्त्यांनी कालबाह्य सॉफ्टवेअर वापरले तर बग्सचा परिणाम होण्याचा धोका वाढत जातो. अपडेट फक्त तक्रार केलेल्या समस्यांचे निराकरण करत नाही तर तक्रार न केलेले बग टाळण्यासाठी सॉफ्टवेअर मजबूत करत असतात.

अपडेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1. जर तुम्हाला Google Chrome अपडेट करायचे असेल तर, सर्वात अगोदर तुमच्या सिस्टमवर Chrome ब्राउझर उघडावा.
2. वेब स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन बिंदूंवर टॅप करा.
3. त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज वर क्लिक करावे लागणार आहे.
4. त्यानंतर, ‘Chrome बद्दल’ वर क्लिक करताच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणती आवृत्ती वापरत आहात ते तुम्हाला समजेल.
5. जर जुन्या आवृत्तीवर असेल, तर ते तुमचे Google Chrome स्वयंचलितपणे नवीनतम आवृत्तीवर अपडेट करेल.