Google upcoming Feature : यूजर्सना गूगलने दिली अप्रतिम भेट, येणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स

Google upcoming Feature : संपूर्ण देशभरात गुगलच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. त्याचबरोबर गुगलही आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत वेगवेगळे आणि जबरदस्त फीचर्स आणत असते. गुगलने काल एक अप्रतिम डूडल बनवून 2022 वर्षाचा निरोप घेतला आहे.

आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अशातच गुगलने आपल्या युजर्सना एक अप्रतिम भेट दिली आहे. या वर्षी एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स दाखल होणार आहे.पाहुयात यादी.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन समजणार 

गुगलकडून एक खास फीचर सादर केले जाणार असून त्यामुळे सर्वांना डॉक्टरांचे लेखन वाचता आणि समजणार आहे. हे नवीन फीचर डॉक्टरांचे हस्ताक्षर समजण्यास मदत करणार आहे.

2. मल्टी सर्च फीचर

आता लवकरच गुगलकडून मल्टी सर्च फीचरचीही घोषणा केली जाणार आहे. हे फीचर रिलीज झाल्यानंतर युजरला त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यातून फोटो काढून किंवा स्क्रीनशॉट घेऊन सर्च करता येणार आहे.

3. Google DigiLocker Android सपोर्ट 

लवकरच गुगलच्या फायलींसाठी DigiLocker Android सपोर्ट उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे वापरकर्ते डिजीलॉकरमध्ये गुगल फाइल्स समाकलित करण्यास सक्षम होतील. तसेच तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर ऑनलाइन प्रवेश करता येणार आहे.

4. Google Pay ची अपडेटेड आवृत्ती 

Google Pay ची अपडेट केलेली आवृत्ती येऊ शकते. यामध्ये यूजर्सना अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. याद्वारे यूजर्सना, इतिहास पाहण्याव्यतिरिक्त, वापरकर्ते पेमेंटशी निगडीत इतर अनेक धमाकेदार फीचर्समध्ये प्रवेश करता येईल.

5. यूट्यूब कोर्स

Google वर वापरकर्त्यांसाठी YouTube कोर्सही येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याद्वारे यूट्यूब निर्मात्यांना या कोर्सचा मोफत लाभ घेता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्रीही अगदी सहज डाउनलोड करता येणार आहे.