Google Pixel 6a : 20 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा गुगलचा सर्वात लोकप्रिय फोन, जाणून घ्या ऑफर आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 6a : वनप्लसप्रमाणे भारतीय बाजारात Google च्या स्मार्टफोनलाही खूप मागणी आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने आपला Google Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये इतकी आहे.

परंतु तुमचे इतके बजेट नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही मूळ किमतीपेक्षा 20 हजारांपेक्षा स्वस्तात हा शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर सविस्तरपणे.

पिक्सेल 6a मध्ये वापरकर्त्यांना क्लीन अँड्रॉइड अनुभव मिळतो, शिवाय यात अनेक कॅमेरा फीचर्सही मिळतील. तसेच पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी, Google चा इन-हाउस टेन्सर प्रोसेसर Pixel 6a मध्ये दिला आहे.

बंपर सवलत

स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. तर Pixel 6a बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 43,999 रुपये ठेवली होती. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका, कारण आता या फोनवर Flipkart ने 43% सवलत देत आहे.

त्यामुळे हा फोन तुम्हाला 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डसह खरेदी किंवा ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत, यावर कमाल 3000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल, ज्यामुळे या फोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत जाईल.

इतकंच नाही तर या फोनवर 21,000 रुपयांपर्यंत कमाल एक्स्चेंज डिस्काउंट मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा या सवलतीचे मूल्य जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असेल. जरी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला नसला तरीही, Pixel 6a ची किंमत 20 हजार रुपयांनी कमी होऊ शकते. चॉक आणि चारकोल या दोन रंग पर्यायांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.

जाणून घ्या फीचर्स

Pixel फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह 6.14 इंच फुल एचडी OLED डिस्प्ले दिला असून हा Google Tensor प्रोसेसरसह Android 12 OS आउट-ऑफ-द-बॉक्ससह येते, ज्याला Android 13 अपडेट प्राप्त झाले आहे. कंपनीच्या या फोनच्या मागील पॅनलवर 12.2MP प्राथमिक सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. 8MP फ्रंट कॅमेर्‍यासह, या फोनला 4410mAh क्षमतेच्या बॅटरीसह टायटन M2 चिपचा आधार असून तो IP67 रेटिंगसह येतो.