Google Pixel 6a Offer : भन्नाट ऑफर! अवघ्या 999 रुपयात Pixel 6a खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 6a Offer : भारतीय टेक बाजारात प्रत्येक वर्षी असंख्य कंपन्या आपले शानदार स्मार्टफोन्स लाँच करत असतात. शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे या सर्व कंपन्यांमध्ये आपल्याला कडवी टक्कर पाहायला मिळते. मागणी जास्त असल्याने या सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त असतात.

दरम्यान जर तुम्हाला कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता अवघ्या 999 रुपयात Pixel 6a खरेदी करू शकता. कमी किमतीत Pixel 6a खरेदी करण्याची भन्नाट संधी कुठे मिळत आहे जाणून घ्या.

जर तुम्हाला Google चा Pixel 6a खरेदी करायचा असल्यास तर तो तुम्ही ऑफरद्वारे अवघ्या 999 रुपयांत खरेदी करू शकता. अशी भन्नाट संधी फ्लिपकार्ट वर मिळत आहे. तुम्हाला यावर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर मिळत असल्याने तो स्वस्तात खरेदी करू शकता.

जाणून घ्या बँक ऑफर

दरम्यान Google Pixel 6A वर बँक ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही हा फोन DBS बँक क्रेडिट कार्डने खरेदी केला तर तुम्हाला या फोनवर 10% सवलत दिली जाणार आहे. तसेच तुम्हाला कोटक क्रेडिट कार्डसह ईएमआय व्यवहारांवर 10% सवलत मिळेल. इतकेच नाही तर, तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक देण्यात येईल.

या स्मार्टफोनची मूळ किंमत 43,999 रुपये इतकी आहे. तो फ्लिपकार्टवर 28,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. अशाप्रकारे तुम्हाला फोनच्या किमतीवर एकूण 15 हजार रुपयांची सवलत मिळेल. तसेच, या फोनवर उपलब्ध असणाऱ्या बँक आणि एक्सचेंज ऑफरमुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.

होणार डबल फायदा

गुगलच्या या स्मार्टफोनवर 28,000 रुपयांची एक्सचेंज सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना फोन बदलून या शानदार सवलतीचा लाभ घेऊ शकता. परंतु हे लक्षात घ्या की यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीसह नवीनतम मॉडेल सूचीचा असावा.