Google Pixel 6a : त्वरित ऑर्डर करा गुगलचा ‘हा’ शानदार फोन! निम्म्या किमतीत येईल खरेदी करता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 6a : बाजारात गुगलच्या स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने या फोनच्या किमतीही जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता तुमच्यासाठी एक संधी आहे.

तुम्ही आता Google Pixel 6a हा फोन निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वीच कंपनीने हा फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. यावर तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. कुठे मिळत आहे अशी शानदार संधी? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Flipkart च्या माहितीनुसार, ग्राहक Google Pixel 6a 43,999 रुपयांऐवजी केवळ 26,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीत तुम्हाला खरेदी सहज करता येईल. या ऑफर बॅनरवर ‘Pixel camera at the lowest price’ असे लिहिण्यात आले आहे.

वास्तविक Google Pixel फोन त्यांच्या कॅमेर्‍यांसाठी ओळखले जात असून त्याची मालिका प्रीमियम सेगमेंटशी निगडित आहे. ते प्रीमियम श्रेणीचे आहेत त्यामुळे, प्रत्येकाला ते खरेदी करता येत नाही. परंतु, निम्म्या किमतीत कंपनीचा शानदार फोन उपलब्ध असेल तर तो कोणाला विकत घ्यावासा वाटणार नाही? जाणून घेऊयात कंपनीच्या पिक्सेल 6a च्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल माहिती.

याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, Google Pixel 6a मध्ये 6.14 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल असून फोनच्या डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. या फोनचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह येत आहे.

शिवाय कॅमेरा म्हणून कंपनी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देत आहे. या फोनच्या मागील बाजूला, f/1.7 अपर्चरसह 12.2 मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी, या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

याच्या पॉवरसाठी, फोनमध्ये 4410mAh बॅटरी तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, Google Pixel 6a मध्ये 5G, Bluetooth 5.2, 4G LTE, Wi-Fi 6E आणि USB Type-C पोर्ट दिले आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.