Google Pixel 6a : भन्नाट ऑफर.. Pixel 7a लाँच होण्यापूर्वी 16,000 रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ सर्वात जास्त विक्री करणारा 5G फोन, पहा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 6a : गुगलचे स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ते मार्केटमध्ये एकच खळबळ उडवून देतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Google Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोननेदेखील चांगला धुमाकूळ घातला आहे. या फोनची मूळ किंमत 43,999 रुपये इतकी आहे.

परंतु आता तो 16,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. अशी भन्नाट ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. येत्या काही दिवसात कंपनीचा आगामी फोन Pixel 7a लाँच होणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वी तुम्हाला Pixel 6a कमी किमतीत खरेदी करता येत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

सध्या कंपनीचा Google Pixel 6a स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 27,999 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येत आहे. मागील वर्षी हा फोन भारतात 43,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. म्हणजेच 16,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता.

तसेच, जर तुम्ही हा फोन SBI क्रेडिट कार्डने खरेदी केला तर तो तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर या फोनवर 26,250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

जाणून घ्या खासियत

या फोनमध्ये 6.14-इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले दिला जात असून जो 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह येत आहे. यात कंपनीचा इन-हाउस गुगल टेन्सर प्रोसेसर दिला आहे. तो अँड्रॉइड ओएसवर काम करेल.

हा फोन Android 13 OS वर अपडेट केला जाईल. तसेच फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये स्पोर्ट्स ड्युअल रियर कॅमेरे, यात 12.2-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल लेन्सचा समावेश आहे. कंपनीच्या या 5G फोनला 4410 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

किती आहे Pixel 7a ची किंमत ?

रिपोर्टनुसार, Pixel 7a ची 128GB स्टोरेज व्हेरियंटसाठी SGD 749 (अंदाजे रु. 46,000) किंमत असेल. इतर स्टोरेज पर्यायांबद्दल अजूनही कोणती माहिती समोर आली नाही.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

रिपोर्टनुसार, कंपनीचा आगामी स्मार्टफोन टेन्सर G2 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येत असून हा फोन 64-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. याच्या मागील पॅनलवर अल्ट्रा-वाइड लेन्ससह 12-मेगापिक्सेल सेन्सर असेल. तर सेल्फीसाठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.