Google Pixel 7a : मस्तच.. कमी किमतीत खरेदी करता येणार नवीन Pixel 7a, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 7a : गुगलने आपला आगामी स्मार्टफोन Pixel 7a नुकताच लाँच केला आहे. या फोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. डिझायनबद्दल बोलायचे झाले तर या फोनची रचना Pixel 7 आणि Pixel 7 Pro सारखीच असणार आहे.

कंपनीकडून यात 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीचा हा फोन तुम्ही 43,999 रुपयांना खरेदी करू शकता. जाणून घेऊयात आगामी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन..

कंपनीने आगामी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात प्राथमिक लेन्स 64MP असून त्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे. तर दुसरी लेन्स 13MP अल्ट्रा वाइड अँगलची असून याच्या समोर 13MP कॅमेरा उपलब्ध असणार आहे. तसेच या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ v5.3 आणि NFC व्यतिरिक्त USB Type-C (3.2 Gen 2) देण्यात आला आहे.

किती आहे किंमत?

किमतीबाबत विचार केला तर कंपनीच्या Pixel 7a च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 43,999 रुपये इतकी आहे. आजपासून Flipkart वरून विक्री सुरू झाली आहे. जर तुम्ही लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केले तर 4,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. जो तुम्ही चारकोल, स्नो आणि सी रंगांमध्ये खरेदी करू शकता.

या स्मार्टफोनमध्ये गुगलचा Tensor G2 प्रोसेसर दिला आहे. मागील वर्षी Google ने या प्रोसेसरसह Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच केला होता. या फोनसोबत टायटन एम2 सिक्युरिटी प्रोसेसर उपलब्ध असून Pixel 7a 8 GB LPDDR5 RAM सह 128 GB UFS 3.1 स्टोरेज ऑफर करतो. यात 6.1-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात येणार आहे ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. या फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे तसेच एलईडी फ्लॅश युनिटसह चंकी कॅमेरा मॉड्यूल आहे.