Google Smartphone Offer : गुगलने आपले Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे मॉडेल लाँच होताच गुगलच्या या दोन फोनच्या किमती झाल्या आहेत. तुम्हाला आता 26000 रुपयांपर्यंत फायदा होईल. जाणून घ्या ऑफर.
स्वस्तात करा Pixel 7 Pro खरेदी
Flipkart वरील आगामी बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्हाला 84,999 रुपयांचा Pixel 7 Pro हे मॉडेल 58,999 रुपयांना म्हणजेच मूळ किमतीपेक्षा 26,000 रुपये कमी किमतीत खरेदी करता येईल. पण सध्या तो फ्लिपकार्टवर 63,999 रुपयांना मिळत आहे.
तसेच सवलतीच्या दरात हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला बँक कार्ड ऑफरचा लाभ घ्यावा लागणार आहे. तुम्हाला स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर फोनची किंमत 32,000 रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी अतिरिक्त सवलतीचा लाभ घेता येईल.
जाणून घ्या Pixel 7a ची किंमत
तसेच गुगलने Pixel 7a हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात 43,999 रुपयांना लॉन्च केला आहे. परंतु, तो आगामी Flipkart Big Billion Days सेल दरम्यान 31,499 रुपयांना खरेदी करता येईल. फोनची सध्या फ्लिपकार्टवर 43,999 रुपयांना विक्री केली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे तुम्ही फोनची किंमत कमी करण्यासाठी बँक ऑफरचा लाभ घेऊ शकता. Flipkart वरील सूचीनुसार, पात्र स्मार्टफोनची एक्सचेंज केली तर फोनच्या किंमतीवर 30,600 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळू शकते.
जाणून घ्या खासियत
फ्लॅगशिप Google Pixel 7 Pro आणि Pixel 7a हे दोन्ही फोन Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्स चालवतात. Android 14 वर श्रेणीसुधारित केले जाऊ शकतात. हे फोन Tensor G2 चिपसेटने सुसज्ज असून याच्या प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, तर Pixel 7a मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे.
शिवाय Pixel 7 Pro 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 30x सुपर रिझोल्यूशन झूम आणि 5x ऑप्टिकल झूमसह 48-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. तर Pixel 7a मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा दिला आहे. प्रो मॉडेलमध्ये 10.8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि Pixel 7a मध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.
स्टोरेजचा विचार केला तर या प्रो मॉडेलमध्ये 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे, Pixel 7a सह तुम्हाला 128GB मिळेल. फेस अनलॉक सपोर्टसह बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी दोन्ही फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असून या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टसह फास्ट वायर्ड चार्जिंगची सुविधा मिळेल. कंपनीचा असा दावा आहे की एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर मोड सक्षम केली तर तुम्हाला 72 तासांची बॅटरी लाइफ मिळेल.