Alert : सध्याच्या काळात अनेकजण इंटरनेट वापरत आहेत, कारण इंटरनेटशिवाय जीवनच अपूर्ण आहे. कोणतीही माहिती इंटरनेटवर सर्च केली तर काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचते.
परंतु, जर तुम्ही गुगल क्रोम ओएस वापरत असाल तर सावध व्हा. कारण सरकारने या वापरकर्त्यांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. परिणामी हॅकर्स तुमचा स्मार्टफोन चटकन हॅक करू शकतील.
सरकारी एजन्सी सायबर सुरक्षेशी निगडित त्रुटी आणि धोक्यांमुळे वेगवेगळ्या सेवांशी संबंधित चेतावणी देत असून आता त्यांनी गुगल क्रोम OS मध्ये असलेल्या काही त्रुटींबद्दल माहिती दिली आहे. सरकारने वापरकर्त्यांना या त्रुटींमुळे सायबर सुरक्षेचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.
या सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना धोका
Mac आणि Linux वर 108.0.5359.71 पेक्षा जुने Chrome OS स्थिर चॅनल व्हर्जन वापरकर्त्यांना धोका असून Windows वर 108.0.5359.71/72 पेक्षा जुनी ChromeOS स्थिर चॅनेल व्हर्जन वापरणारे वापरकर्ते धोक्यात आहेत. या वापरकर्त्यांनी सॉफ्टवेअर व्हर्जन तातडीने अपडेट करा असे सरकारने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे.
हॅकर्सना होईल फायदा
या त्रुटींचा हॅकर्सना फायदा होईल, ते रिमोट हल्ले करतील. थोडक्यात सांगायचे झाले तर, तुमच्या डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश न करता ते हानी पोहोचवू शकतात.
असे होईल नुकसान
हॅकर्स वापरकर्त्यांना रीडायरेक्ट करू शकतात. जर असे झाले तर हॅकर्स तुमची प्रणाली पूर्णपणे लॉक करू शकतात किंवा डिव्हाइसमध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान करू शकतील.