Google Pixel Fold : ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार गुगलचा स्मार्टफोन, असणार जबरदस्त फीचर्स

Google Pixel Fold : गुगल लवकरच त्यांच्या ग्राहकांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. कारण लवकरच गुगल आपला नवीन स्मार्टफोन म्हणजेच Google Pixel Fold भारतात लाँच करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या स्मार्टफोनला 12GB पर्यंत RAM आणि octa-core चिपसेट मिळेल. काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनचे डिझाइन लीक झाले होते. ग्राहकांना यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.

या दिवशी होणार भारतात लाँच

Advertisement

या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनचे कथित डिझाइन रेंडर लीक झाले होते. हा फोन मे 2023 मध्ये Pixel टॅबलेट सोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे.

स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनला गुगल फेलिक्स म्हणून गीकबेंचवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. तसेच हे 2.85GHz ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित असून 12GB RAM सह जोडलेले आहे. हा स्मार्टफोनअँड्रॉइड 13 वर देखील चालू शकतो. या स्मार्टफोनने 1,047 चा सिंगल-कोर परफॉर्मन्स स्कोअर आणि 3,257 गुणांचा मल्टी-कोर परफॉर्मन्स स्कोअर मिळवला.

Advertisement

किंमत

या स्मार्टफोनला दोन्ही फ्रंट-फेसिंग शूटर्समध्ये 9.5-मेगापिक्सेल सेन्सर्स आहेत. त्याशिवाय यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील असू शकतो. पिक्सेल फोल्ड चॉक (पांढरा) आणि ऑब्सिडियन (काळा) रंगात येऊ शकतो. त्याची किंमत सुमारे $1,799 म्हणजेच सुमारे 1,50,000 रुपये इतकी असू शकते.

याने Geekbench वर समान परफॉर्मन्स स्कोअर प्राप्त केला. मागील अहवालांनी असे सुचवले आहे की पिक्सेल फोल्डला ‘फेलिक्स’ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 2023 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होईल अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement

या स्मार्टफोनचे डिझाईन रेंडर नुकतेच लीक झाले होते यामध्ये बेझल्ससह मोठा इनर डिस्प्ले आहे. आतील डिस्प्लेवर कोणताही होल-पंच स्लॉट किंवा अंडर-डिस्प्ले कॅमेरा नाही. याशिवाय, वरच्या उजव्या कोपर्यात सेल्फी कॅमेराला सपोर्ट करू शकतो.