Pixel Fold : गुगलच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स, इतक्या किमतीत खरेदी करता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pixel Fold : मार्केटमध्ये गुगलच्या स्मार्टफोनची क्रेझ आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच कंपनी आता Pixel 7a आणि Pixel Fold हे जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे.

परंतु, हा स्मार्टफोन लाँच व्हायला काही वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांना जबरदस्त फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी किती पैसे मोजावे लागणार असा अनेकांना प्रश्न पडत आहे.

Pixel 7a ची किंमत Pixel 6a सारखीच असू शकते. Android प्राधिकरणाच्या सूत्रांनी उघड केले की आगामी Pixel A सीरिज फोनची किंमत $449 असेल, म्हणजे अंदाजे 37,185 रुपये आहे. भारतीय बाजारासाठी त्याची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.

मार्केटमध्ये Google Pixel 7a जबरदस्त फीचर्ससह लाँच होईल.सध्या कंपनीचा Pixel 6a खूप कमी किंमतीत विकला जात आहे. जर तुम्ही चांगले सॉफ्टवेअर, कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही तो विकत घेऊ शकता.

Pixel Fold हा Google चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे. Pixel Fold ची किंमत $1,799 म्हणजेच सुमारे 1.49 लाख रुपये इतकी आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy Z Fold 4 च्या किंमतीसारखीच ही किंमत आहे.

सॅमसंगचा हा फोन भारतात 1.54 लाख रुपयांना विकला जात आहे. गुगल या फोनबद्दल पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल किंवा मे मध्ये घोषणा करू शकते.सॅमसंगचा हा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे, त्यामुळे कंपनीने त्यांचा फोन कमी किमतीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.