Goverment Scheme: शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. यास मधील जर काही योजनांचा विचार केला तर त्या शेती सिंचनासाठी फार महत्वपूर्ण योजना असून यामध्ये प्रामुख्याने सिंचन क्षेत्राशी संबंधित असलेल्या योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या होय.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शासनाकडून घालण्यात आलेल्या होत्या. परंतु आता यातील एक महत्त्वाचे अट शिथिल करण्यात आली असून त्याचा फायदा शेतकरी बंधूंना नक्कीच होण्याची शक्यता आहे. या दोन्ही योजना संबंधी महत्त्वाचे अपडेट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना प्रामुख्याने राबवल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून जुन्या विहिरींचे दुरुस्ती आणि नवीन विहिरीचे काम इत्यादीसाठी अनुदान स्वरूपात मदत केली जाते. परंतु या योजनांचा विचार केला तर या दोन्ही योजनांमध्ये एक अट अशी होती की दोन विहिरींमधील अंतर 500 फूट असणे गरजेचे होते. परंतु आता ही अट शिथिल करण्यात आली असून आता शासनाने दीडशे फूट परिघांमध्ये विहीर घेण्यास मुभा दिली आहे. सध्या जर आपण औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी 293 तर बिरसा मुंडा योजनेसाठी 45 ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत
. ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल ते 31 मार्च अखेर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. जर आपण या योजनांच्या बाबतीत मागच्या वर्षाचा विचार केला तर यामध्ये खाजगी आणि सरकारी अनुदानित विहिरींच्या अंतराबद्दल भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने ज्या काही अटी घातल्या होत्या त्यामध्ये फार मोठे तफावत होती. यामध्ये तीस फुटांच्या अंतरावर खाजगी विहीर खोदण्यास परवानगी आहे मात्र सरकारी योजनेतून विहिरी खोदण्यासाठी पाचशे फुटांची अट होती. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून दोन विहिरींचा लाभ घ्यायचा असेल तर यामधील अंतर 500 फूट असणे गरजेचे होते आणि तरच या योजनांचा लाभ हा मिळत होता.
परंतु या अटीचा विचार केला तर ही अट लाभार्थ्यांसाठी खूप मोठी समस्या ठरत होती. या अटीमुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले होते. परंतु आता शासनाने ही अटच रद्द केली असून आता दीडशे फूट परिघांमध्ये दोन विहिरी करता येऊ शकणार आहेत या तारखेपूर्वी करावे अर्ज ज्या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून विहिरीचा लाभ घ्यायचा असेल ते सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून नवीन विहीर करण्यासाठी 31 मार्चअखेर पर्यंत अर्ज करू शकतात.