अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-स्वराज इलेक्ट्रीकल्स या नावाने बनावट संस्था उघडुन पाथर्डी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीची विद्युतीकरणाची कामे करुन शासनाची फसवणुक केली आहे.
तरी या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी किरण पालवे यांच्या विरु्दध जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्य़कारी अधिका-यांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुभाष घोरपडे यांनी केली आहे.
जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सुभाष घोरपडे यांनी लेखी निवेदन देवुन मागणी केली आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील अतुल कोठारे यांचे स्वराज इलेक्टीकल्स ही संस्था नोंदणीकृत आहे.
मात्र पाथर्डीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी किरण पालवे यांनी या संस्थेचा नोंदणी क्रमांक वापरुन स्वतः संस्थेचे संचालक असल्याचे दाखवुन ग्रामपंचायतीची विद्युतीकरणाची कामे मिळविले.
त्याची लाखो रुपयाची बिले स्वतःच्या नावाने उघडलेल्या पाथर्डीच्या सेंट्रल बँकेच्या खात्यामधे वर्ग करुन घेतली आहेत. खाते उघडताना बँकेचीदेखील फसवणुक केली आहे. तरी या प्रकरणी चौकशी होवुन कारवाई करावी. अशी मागणी घोरपडे यांनी केली आहे.