Senior Citizen Pension : देशातील जेष्ठ नागरिकांसाठी सरकार सतत काही ना काही योजना आणत असते. सरकारकडून आता जेष्ठ नागरिकांसाठी एक भन्नाट पेन्शन योजना आणली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सरकारने आणली आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकच या योजनेचा फायदा घेऊ शकतात. प्रधानमंत्री वय वंदना योजना सरकारने आणली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजेचा फायदा घेईल असेल तर त्यांना अगोदर काही गुंतवणूक करावी लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने पेन्शनची सुविधा त्वरित उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये जेष्ठ नागरिकांना घरबसल्या उतरत्या वयात पेंशन मिळते.
योजना
सरकारी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक PM वय वंदना योजना योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहे. त्यांना दरमहा निवृत्ती वेतनाची हमी मिळेल.
एवढेच नाही तर तुमची गुंतवलेली मूळ रक्कम या योजनेत सुरक्षित राहते, तर नागरिकांना नियमित अंतराने परतावाही दिला जातो.
या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या तारखेपासून 10 वर्षांच्या कालावधीनंतर तुमचे पैसेही परत येतील.
या योजनेत पती-पत्नीने एकत्र पैसे गुंतवले तर दरमहा 18,500 रुपये पेन्शन मिळू शकते.
ज्येष्ठ नागरिकांनी योजनेनुसार 15 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जी एक वर्षानंतर परत केली जाईल, तर लाभाची रक्कम तुम्हाला दरमहा किंवा तुम्ही निवडलेल्या विशिष्ट अंतराने दिली जाईल.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनची सुविधा दिली जाते.
इच्छुक लोक 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात, याचा अर्थ फक्त काही महिने शिल्लक आहेत.