ताज्या बातम्या

Maharashtra : “मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, खोके सरकारमध्ये जीव नाही…”

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra : राज्यात जसे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून त्यांच्यावर येत आहे. तसेच विरोधी पक्षांकडून खोटे सरकार असाही उल्लेख वारंवार करण्यात येत आहे. आता खोके सरकारमध्ये जीव नाही अशी खोचक टीकाही सरकारवर करण्यात आली आहे.

सामनाच्या मुखपत्रातून शिंदे आणि फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरूनही राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनात म्हंटले आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान होत असताना खोके गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही.

बेळगावात सुरु असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील एकाही भाजप पुढाऱ्याचा धिक्कार केला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत, सोलापुरात अक्कलकोटवर दावा सांगितला आहे.

खोके सरकारात जीव नाही की मनगटात सळसळ नाही, अशी खोचक टीका सामनाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. अशा मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, त्यातच सगळ्यांचे हित आहे, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपच्या मवाळ धोरणावर सामनातून टीका करण्यात आली आहे.

तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर केलेल्या दाव्यांवर सरकार अद्याप शांत का आहे, असे प्रश्न सामनातून करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्य वागण्याच्या मुद्यावरूनही टीका करण्यात आली आहे. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत. सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत, असा टोमणाही लगावण्यात आलाय.

एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका मंदिरात त्यांनी ज्योतिष्याला हात दाखवण्याची चर्चा रंगली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Maharashtra