अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राज्यात तीन पक्षांच्या सरकारचा वेळ एकमेकांची मनधरणी करण्यातच जात आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण गमवावे लागले.
दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने यापूर्वीच लागू केलेले १० टक्के आर्थिक आरक्षण सरकार घाईघाईत लागू करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आपले अपयश झाकत केंद्र सरकारविरोधात ओरड करत आहेत. मराठा आरक्षणासाठी ५६ मोर्चे निघाले.
त्यात काहीजण हुतात्मे झालेत. या मोर्चांचा त्रास भाजप सरकारलाही झाला. मात्र, मराठा आरक्षणाची अनेक वर्षांपासूनची मागणी भाजपने लक्षात घेऊन ती उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकेल अशीच मांडली, पण मराठा आरक्षणाबाबत राज्यातील तीन पक्षांचे सरकार उदासीन असल्यानेच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले.
मराठा आरक्षणाचा लढा भाजपकडून आपण सर्व पातळीवर लढणार आहोत, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली अगस्ति महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत सांगितले.