ताज्या बातम्या

Government Scheme : बातमी कामाची! सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळते दोन लाखांचे आर्थिक सहाय्य; वाचा याविषयी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme :- भारत एक शेतीप्रधान देश आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष अवलंबून आहे. यामुळे मायबाप शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवित असते.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतकरी बांधवांना शेतीमध्ये काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेकदा शेतकऱ्यांना (Farmers) शेतीमध्ये काम करताना अपघात देखील होतो.

काही शेतकरी बांधवांचा शेतीमध्ये काम करताना मृत्यु देखील होत असतो. सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक, इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू शेतकरी कुटुंबांसाठी मोठा धक्का असतो.

परिवारातील कर्ता पुरुष निघून जातो अशावेळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो. याशिवाय संबंधित शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर येतो.

या महागाईच्या काळात तर उदरनिर्वाहाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो. यामुळे मायबाप शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme) सुरू केली आहे.

या विमा योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यास किंवा कायमचे अपंगत्व (Permanent disability) आलेल्या शेतकऱ्यास सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते.

असे असले तरी, या शेतकरी कल्याणाच्या योजनेची अजूनही अनेक शेतकरी बांधवांना माहिती नसल्याचे समजत आहे. या अपघात विमा योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या शेतकऱ्याच्या परिवारास दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते.

परिवारात संबंधित शेतकऱ्यांचे आई-वडील, पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा सामावेश असू शकतो. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतात तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये दिले जातील अशी तरतूद देखील या योजनेत केली गेली आहे.

याशिवाय अपघातात एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत संबंधित शेतकऱ्याला दिली जाते.

कोणत्या कारणांनी अपघात झाल्यास योजनेसाठी गृहीत धरले जाते? मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेचा लाभ खालील कारणांनी अपघात झाल्यास दिला जात असतो.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का बसून मृत्यू, वीज पडून मृत्यू, कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा होऊन मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प दश व विचू दश, हिस्त्र जनावरांचा हल्ला, जनावरांनी चावल्यास किंवा खाल्ल्यास मृत्यू झाला.

असा अपघात अथवा मृत्यू ग्राह्य धरला जात नाही नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्यांच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या नशेतून अपघात, स्त्रियांचा बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटनाचा या विमा संरक्षणात समावेश नाही.

या योजनेचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे इतर विमा योजने प्रमाणे यामध्ये शेतकऱ्यांना पैसे भरण्याची आवश्यकता नसते. कारण की या योजनेसाठी सर्व पैसे शासनाकडून पुरविले जातात.

Ahmednagarlive24 Office