सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी; कमिशन लाभ अधिकाऱ्यांसाठी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Government scheme :- शेतकरी प्रबल होण्यासाठी शासन वेगवेगळ्या सरकारी योजना आखत असते. पण या योजना शेतकऱ्याला पदरात पाडून घेण्यासाठी ठिक ठिकाणी कमिश देण्याचा घाट घालण्यात येत आहे.p

शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुटपालन इत्यादी व्यवसाय करत असतो. त्यामागे त्याचा अधिकचा नफा मिळविण्याचा शेतकऱ्याचा मुख्य उद्देश असतो.

तर शेतकऱ्यांना जोडधंद्यातून अधिकचे उत्पादन वाढवून आर्थिक नफा कसा मिळवता येईल या दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते.

व या योजनांच्या मदतीने शेतकऱ्याला शेतीजोड धंद्यासाठी साठी अनुदान दिले जाते. शासनाकडून पशुपालनासाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत.

या अनुदान योजनेमध्ये एक किंवा दोन दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना दिली जात आहेत. पण या योजना शेतकऱ्याला मिळवण्यासाठी कमिशन देण्यासाठी अधिकारीवर्ग घाट घालत आहेत.

शासकीय योजनेचा अनुदानातून मिळालेल्या लाभातून कमी किंमतीचे पशु जास्त किंमतीचे दाखवून लाभार्थ्याच्यामाथी मारली जात आहे.हा धक्कादायक प्रकारवर्ध्यात उघडकीस आला आहे.

असाचे प्रकार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील होत आहे. त्या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे.20 हजाराची गाय 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत लाभार्थ्याच्यामाथी मारली जात आसून पशुधन विकास अधिकाऱ्यांचे गाय विक्रेत्यांशी संबंध असल्यामुळे ठराविकच विक्रेत्यांकडून गाय खरेदीचा अट्टाहास  अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

अशी लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच गाईच्या मूळ किमतीपेक्षा दहा ते वीस हजार रुपये वाढवून सांगून.लाभार्थ्यांना वाढीव किंमत गाय खरेदी करावी लागत असल्याने शेतकऱ्यालाच नुकसान सोसावे लागत आहे.