सरकारने लवकरात लवकर गाव जत्रा व तमाशा चालू करावे -रघुवीर खेडकर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने दुसऱ्या करोणा लाटे नंतर जे काय हळूहळू चालू केले आहे त्यापद्धतीने गाव जत्रा ,तमाशा चालू करावे व कलावंतांना रोजीरोटीसाठी भटकंती चालू होती

थांबावी अशी कळकळीची विनंती तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,व आमचे लाडके महसुल मंत्री बाळासाहेब थोरात

यांनी आमच्या कलावंतांच्या प्रत्येक प्रश्न जातीने लक्ष घातले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व इथून पुढे ज्या पद्धतीने बाजारपेठा चालू झाल्या आहे सार्वजनिक व्यवस्था चालू झाली आहे

त्याच पद्धतीने गाव जत्रा ,तमाशा चालू करावेत व आमच्या गोरगरीब कलावंतकडे याकडे लक्ष द्यावे जेणेकरून वेळी आम्हाला तुमच्याकडे सर्व गरजासाठी व घटकांसाठी जी मागणी करावी लागते

ती मागणी थांबेल व हातावर पोट भरणारे कलावंत कलावंतच्या माध्यमातून आपले पोट भरतील आशी भावना तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24