कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  कोपर्डी,जिल्हा:अहमदनगर येथे घडलेल्या बालिकेवरील बलात्कार आणि खून प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यांनी या प्रकरणातील तीनही आरोपीना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्‍चितीकरण्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठ येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज दाखल विहित वेळेत दाखल केला होता. त्याचप्रमाणे, यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ यांने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल औरंगाबाद खंडपीठात दाखल केले होते.

त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी औरंगाबाद खंडपीठ येथे होऊन यातील आरोपी क्रमांक दोन याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात घेण्यात आले होते. यातील एक आरोपी संतोष भवाळ याने मुंबई उच्च न्यायालय येथे स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण औरंगाबादहुन मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती.

औरंगाबाद येथे प्रलंबित असणारे आरोपी संतोष भवाळचे अपील त्याचप्रमाणे राज्य शासनाने दाखल केलेले फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणाचे अपील ही दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात. यादरम्यान यातील आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक तीन नितीन भैलुमे यांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील विलंबाने दाखल केली आहेत.

या तिन्ही प्रकरणाची त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती तावडे यांच्यासमोर मागील तारखेस होऊन सर्व प्रकरणे दाखल करून घेऊन न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी सदर प्रकरणाची नियमित सुनावणी घेण्यासंबंधी सूचित केले होते.

त्या अनुषंगाने कोपर्डी प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथे 25 फेब्रुवारी 2020 पासून नियमितपणे सुरू होणारहोती पण लॉकडाउनमुळे ती होऊ शकलेली नाही.

या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी आज उच्च न्यायालयाला विनंती पत्र ऑनलाईन सादर केले आहे.यामुळे या प्रकरणाची लवकरच सुनावणी होण्यासंबंधी आशावाद व्यक्त केला जात आहे.