Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रह आणि राशींना महत्वाचे स्थान आहे, ग्रह जेव्हा आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. अशातच दिवाळीनंतर ग्रहांचा अप्रतिम संयोग होणार आहे. दिवाळीनंतर वृश्चिक राशीत तीन ग्रहांचा मेळ असेल.
6 नोव्हेंबर रोजी बुद्धिमत्ता व इत्यादींचा कारक बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. नंतर, 16 नोव्हेंबर रोजी मंगळ संक्रमण करेल. आणि 17 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत ग्रहांचा राजा सूर्य प्रवेश करेल. एकाच राशीत हे तीन ग्रह एकत्र असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. या योगाचा पाच राशींवर प्रभाव पडणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मेष
मेष राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा फायदा होणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्न वाढू शकते. यामुळे आर्थिक अडचणी संपतील आणि तुम्ही निवांत राहाल . तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. ज्यमुळे तुमची कामात प्रगती होईल. एकूण हा योग खूप फायदेशीर मानला जात आहे.
मिथुन
या काळात मिथुन राशीच्या लोकांना अचानक लाभ होऊ शकतो. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात देखील लाभ होण्याची शक्यता आहे, एकूण या काळात आर्थिक अडचणी संपतील आणि तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील.
कन्या
वृश्चिक राशीत तयार झालेला त्रिग्रही योग कन्या राशीच्या लोकांसाठी देखील फलदायी असेल. या काळात व्यावसायिकांना फायदा होईल आणि नोकरी आणि करिअरशी संबंधित चांगली बातमी ऐकू येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैशांमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवाळी नंतरचा काळ खूप शुभ मानला जात आहे. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच बँक बॅलन्स वाढेल आणि आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल. या काळात पैशांसंबंधित काही चिंता नसेल, त्यामुळे तुम्ही निवांत राहाल.
सिंह
वृश्चिक राशीत तयार झालेला हा योग या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जात आहे. या काळात व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-समृद्धी वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. तसेच तुम्ही आर्थिक स्थिती मजबूत होईल.