Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रहांना खूप महत्व आहे. ग्रह एका विशिष्ट वेळाने आपली राशी बदलत असतात. ग्रहांच्या राशीतील बदलाचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. अशातच 2 दिवसांनंतर 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. जे काहींसाठी खूप शुभ असेल तर काहींसाठी अशुभ असेल. सूर्याचे संक्रमण कुंभ राशीसह चार राशींसाठी खूप शुभ मानले जात आहे. त्याच वेळी, मेष राशीसह 3 राशींसाठी सूर्याचे संक्रमण अशुभ मानले जात आहे.
‘या’ राशींसाठी खूप शुभ मानले जात आहे सूर्याचे संक्रमण
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण फलदायी मानले जात आहे. या काळात धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या वेळी या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. तसेच त्यांची पैशांमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. एकूणच हा काळ या राशीच्या लोकांसाठी आनंदाने भरलेला असेल.
मकर
यावेळी मकर राशीच्या करिअर घरात सूर्य असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. करिअर आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. तसेच तुमचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. या काळात तुमचे करिअर वेगाने पुढे जाताना दिसेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
कुंभ
या काळात या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. या काळात यशाची सर्व दारे उघडतील. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. सूर्यदेवाच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल. व्यवसायात लाभ होईल. तसेच नोकरीत बढती मिळेल. एकूणच नशीबाची साथ असल्यामुळे सगळी कामं मार्गी लागतील.
कन्या
या काळात कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यही चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एकूणच सूर्याचे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे.
‘या’ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज
एकीकडे, काही राशीच्या लोकांवर सूर्याच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव पडेल. चार राशी आहेत ज्यासाठी सूर्याचा राशी बदल अनुकूल होणार नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून, येणारा महिना वृषभ, मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अडचणींनी भरलेला असू शकतो.