अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शहरातील सिध्दीबाग जवळील बहुजन शिक्षण संघाचे दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पटेकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल तर नूतन प्राचार्यपदाची सूत्रे राजेंद्र एडके यांनी स्विकारली असता
त्यांचा स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी गौरव केला.
यावेळी बबन कसाब, भिमराव जाधव, महेंद्र सोनवणे उपस्थित होते. पै. नाना डोंगरे म्हणाले की, बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी दादासाहेब रुपवते विद्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे.
सर्वसामान्य घटकातील विद्यार्थी या शाळेत घडले असून, विविध पदावर कार्यरत आहे. या शाळेचे प्राचार्य, शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
सेवानिवृत्त झालेले प्राचार्य रविंद्र पटेकर यांनी सक्षमपणे आपले कार्यभार सांभाळून विद्यालयासह महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवली. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला.
नूतन प्राचार्य राजेंद्र एडके यांची वाटचाल देखील त्याच पाऊलावर असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्याबद्दल पटेकर व एडके यांनी डोंगरे संस्थेचे आभार मानले.