जबरदस्त ! ‘ह्या’ठिकाणी 3 महिन्यांत मिळाले एफडीपेक्षाही 4 पट जास्त व्याज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- आपण टीव्हीवर किंवा अन्यत्र बर्‍याच वेळा “म्युच्युअल फंड बरोबर आहे” अशी जाहिरात पाहिली असेल. पण म्युच्युअल फंड खरोखरच बरोबर आहेत का? या प्रश्नाला बहुतेक तज्ञांनी उत्तर ‘हो’ असे दिले आहे. पहिली गोष्ट म्हणजे शानदार रिटर्न.

म्युच्युअल फंडाच्या बर्‍याच योजना आहेत, ज्या सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये एफडी सारख्या मर्यादित परतावा देणाऱ्या पर्यायांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना अनेक पटीने जास्त परतावा मिळाला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची सुरक्षा. म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवलेले पैसे फंड मॅनेजरद्वारे संपूर्ण रिसर्च आधारे इतर पर्यायांमध्ये गुंतवले जातात. दरम्यान, अशा काही योजना आहेत ज्यांनी गेल्या तीन महिन्यांत एफडीपेक्षा 4 पट रिटर्न दिला आहे. अशा सर्वोत्कृष्ट 5 म्युच्युअल फंड योजनांविषयी जाणून घ्या.

यूटीआई ट्रांसपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स फंड –

यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंडने गेल्या तीन महिन्यांत 20.4% रिटर्न दिला आहे. एफडीकडून असा परतावा मिळण्यास तुम्हाला किमान 3 वर्षे लागू शकतात.

मागील 1 वर्षात यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंडाने गुंतवणूकदारांना 32.12% रिटर्न दिला आहे. फंडाचा 6 महिन्यांचा रिटर्न 34.43 टक्के राहिला आहे.

मिरे एसेट मिडकॅप फंड –

मिरे एसेट मिडकॅप फंडानेही तीन महिन्यांत 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत फंडाचे उत्पन्न 24.04 टक्के झाले आहे. मिरे एसेट मिडकॅप फंडमधील गुंतवणूकदारांना गेल्या 6 महिन्यांत 39.67% शानदार रिटर्न मिळाला आहे. त्याचप्रमाणे या फंडाचे 1 वर्षाचे रिटर्न 35.97 टक्के आहे.

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड –

गेल्या तीन महिन्यांत फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने चांगली कामगिरी केली. फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 21.09 टक्के इतका मोठा रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांचा रिटर्न 38.57 टक्के होता आणि 1 वर्षाचा रिटर्न 28.83 टक्के होता.

कोटक स्मॉल कॅप फंड –

कोटक स्मॉल कॅप फंडाचा तीन महिन्यांचा परतावाही उत्कृष्ट आहे. या फंडामुळे तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 25.85 टक्के नफा झाला आहे. त्याचबरोबर, कोटक स्मॉल कॅप फंडाने मागील 6 महिन्यांतील 46.53 टक्के आणि 1 वर्षासाठी 40.29 टक्के परतावा दिला आहे. फंडाचा 6 महिन्यांचा परतावा खूप मजबूत आहे.

एसबीआय कॉन्ट्रा फंड –

एसबीआय कॉन्ट्रा फंडाने गेल्या तीन महिन्यांत 27.25% परतावा दिला आहे. यामानाने एफडी व्याजदर खूप कमी आहेत. मोठ्या बँकांमध्ये तुम्हाला फक्त 6-6.5% रिटर्न मिळू शकतो. या अर्थाने, 27.25 टक्के नफा एफडीच्या 4 पट आहे.

त्याचप्रमाणे एसबीआय कॉन्ट्रा फंडाने गेल्या 6 महिन्यांत 43.03 टक्के आणि 1 वर्षात 43.92 टक्के रिटर्न दिला आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर एसआयपी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24