अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-हवेत उडणारी कार, ड्रायव्हरशिवाय चालणारी कार…. आणि अशा अनेक अनोख्या वाहनांबद्दल तुम्ही वाचलेले, पाहिलेले किंवा ऐकले असेलच.
सेल्फ-बॅलेन्सिंग कारबद्दलही ऐकले असेलच. परंतु तुम्ही सेल्फ बॅलेन्सिंग टूव्हीलर्स बद्दल ऐकले आहे का? कदाचित आपल्यापैकी काहींनाच या बाईकबद्दल माहिती असेल, चला जाणून घेऊयात … कार, बाईक आदींची निर्मिती करणाऱ्या होंडाने अशी बाईक आणण्याची तयारी सुरु केली आहे, त्यास ड्रायव्हर शिवाय नियंत्रित केले जाईल.
कंपनीने चार वर्षांपूर्वीदेखील या सेल्फ-बॅलेन्सिंग बाईकची झलक दाखविली होती. तथापि, हे अद्याप सुरू झालेले नाही. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या इनोवेशन एंड ग्रोथ एट ट्रिनिटी कंसल्टिंगचे सीईओ एंथनी जे जेम्स यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये हे स्पष्ट झाले आहे की ही बाईक स्वत: स्टँडविना उभी आहे. एका इशार्यावर ती राइडरच्या पाठोपाठ जात आहे. अचानक या बाईकचा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला तो दुचाकीप्रेमींना रोमांचित करणारा आहे.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये प्रथमच दिसली बाईक –
काही वर्षांपूर्वी ही बाईक प्रथम कंपनीच्या शोकेस दरम्यान दिसली. खरं तर, 2017 मध्ये लास व्हेगास येथे झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये होंडाने राईड असिस्ट तंत्रज्ञानासह बाइक शोकेस केली होती. या अगदी वेगळ्या प्रकारच्या बाईकबद्दल असे सांगितले गेले की, राईड असिस्ट टेक्नॉलॉजी असलेली अशी बाईक लवकरच बाजारात येऊ शकते. तथापि, आतापर्यंत होंडा कंपनीने या बाईकबद्दल फारसा रीविल्ड दिली नाही.
बाईक तंत्रज्ञान कसे कार्य करते?
रायडरच्या मदतीशिवाय ही बाईक स्वतः बॅलन्स बनवते. एवढेच नव्हे तर, रायडरने बाईकला आपल्या मागे येण्याची कमांड देताच बाईक स्वयंचलितपणे राईडरच्या मागे जाते. ही बाईक स्टँडशिवाय उभी राहते. बाईकमधील फोर्क त्याच्या दोन्ही चाकांचा बेस वाढवितो, ज्यामुळे बाईक ऑटामैटिक बॅलेन्स राहते.
रोबोट सारखी सिस्टम ; पडण्याचा अंदाज येतो ?
होंडाने या बाईकचे तंत्रज्ञान असीमो रोबोटमध्ये वापरल्याप्रमाणेच वापरले आहे. या सिस्टीमद्वारे बाईकला कल्पना येते की कोणत्या अँगलमध्ये कोसळू शकते आणि हाच अंदाज घेत ही सिस्टम दुचाकीला उलट दिशेने नेते व खाली पडण्यापासून प्रतिबंध करते. ही टेक्निक प्रत्येक सेकंदाला हजारो वेळा कार्य करू शकते आणि म्हणूनच बाईकमध्ये घसरण किंवा पडण्याची शक्यता राहत नाही.
या बाईकचे तंत्र अधिक चांगले संतुलनासाठी गुरुत्वाकर्षणाचे केंद्र देखील सुधारते. सेल्फ राइडिंगच्या या अनोख्या बाईकने सन 2017 मध्ये जगभरातील दुचाकीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. तथापि, या बाईकचे उत्पादन आणि लॉन्चिंगबाबतची माहिती होंडा कंपनीच्या वेबसाइटवर शेअर केलेली नाही.