Redmi 11 Prime : शानदार ऑफर! अवघ्या 11 रुपयात घरी आणा ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi 11 Prime : भारतातील Xiaomi ही दिग्ग्ज टेक कंपनी आहे. या कंपनीचे जवळपास सर्व स्मार्टफोन खूप लोकप्रिय आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. तसेच कंपनी अनेक स्मार्टफोनवर वेगवेगळ्या ऑफर्स देत असते.

अशीच एक ऑफर कंपनी आता देत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Redmi 11 Prime हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 11 रुपयात घरी नेऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर स्वस्तात मस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

फीचर्सच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कंपनीचा हा स्मार्टफोन खूप मजबूत आहे. मोठ्या डिस्प्ले शिवाय, यात 50MP ट्रिपल कॅमेरा आहे. कंपनीकडूनच या डिव्हाइसवर एक जबरदस्त डील ऑफर केली असून याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टर शेअर केले आहे. फक्त 11 रुपये दिल्यानंतर, ग्राहक हा फोन विकत घेऊ शकतात.

असा घ्या फायदा

Xiaomi Mi Store वर हा स्मार्टफोन केवळ 11 रुपयांमध्ये घरी नेता येत आहे. तुम्हाला कंपनीच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन 11 रुपये द्यावे लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला उर्वरित खर्च नंतर हप्त्यांमध्ये भरावा लागणार आहे.Amazon वरून हा फोन विकत घेतल्यावर 20% फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.

जर तुम्ही Amazon वरून Redmi 11 Prime चे बेस मॉडेल खरेदी केले तर 14,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांना खरेदी करता येईल.तसेच, HSBC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. यावर एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात 11,350 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

असे आहेत स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनला MediaTek Helio G99 प्रोसेसरसह मजबूत कामगिरी मिळते आणि Android 12 वर आधारित MIUI 13 सॉफ्टवेअर स्किन दिली आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाल्यास यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

या फोनच्या मागील पॅनलवर 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सोबत 50MP AI मुख्य कॅमेरा लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसच्या 5000mAh बॅटरीला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.