Reliance Jio : शानदार ऑफर! मिळणार 112GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलसह इतर अनेक सुविधा, किंमत आहे फक्त..

Reliance Jio : जिओच्या वापरकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. अनेक जण जिओची सेवा वापरत आहेत. वापरकर्त्यांच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊनच कंपनी प्लॅन सादर करत असते.

कंपनीचे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत ज्यामध्ये दररोज 2 GB डेटा देत आहे. यापैकीच एक म्हणजे 543 रुपयांचा प्लॅन. विशेष म्हणजे यामध्ये केवळ डेटा नाहीतर इतर अनेक सुविधा दिल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

543 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनची किंमत 543 रुपये असून 56 दिवसांची वैधता आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 2 महिने रिचार्ज करावा लागणार नाही. जर तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही Jio अॅप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सक्रिय करू शकता.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा म्हणजेच 112GB डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत खाली जाईल. तसेच तुम्हाला 24×7 इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मिळेल. सोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात.

मिळतात हे फायदे

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएसही मोफत मिळतात. तसेच ग्राहकांना JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. म्हणजेच यावर तुम्ही जिओ सिनेमावर 56 दिवस चित्रपट पाहू शकता.

दिवसाला येईल इतका खर्च

या प्लॅनची एका दिवसाची किंमत 10 रुपये इतकी आहे. दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने हा प्लॅन चांगला आहे.