Samsung 5G Smartphone : जबरदस्त ऑफर! ‘या’ 5G फोनवर मिळत आहे 11 हजारांपर्यंत डिस्काउंट

Samsung 5G Smartphone : स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सॅमसंगच्या वेबसाइटवर एक तगडी ऑफर दिली जात आहे.

कंपनीच्या Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनवर एकूण 11 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर काही दिवसांसाठी असून स्वस्तात सॅमसंगचा 5G स्मार्टफोन विकत घेण्याची संधी गमावू नका.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फिचर आणि स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये, कंपनी 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल HD+ TFT डिस्प्ले देत असून तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रॅम प्लस फिचरसह 16 GB पर्यंत रॅम आणि इंटरनल स्टोरेज 128 जीबी आहे. 1 टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट असलेल्या या सॅमसंग फोनमध्ये 2.4GHz आणि 2GHz CPU स्पीडसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे यामध्ये 50-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह 5-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तसेच सेल्फीसाठी तुम्हाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

कंपनी यामध्ये 6000mAh ची बॅटरी देत असून या फोनसोबत चार्जर देत नाही. 12 5G बँडला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला ऑटो-डेटा स्विचिंगची सुविधा मिळेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन One UI4 वर काम करतो.