पोस्टाची शानदार स्कीम : एकदाच 2 लाख गुंतवल्यास व्याज म्हणून मिळतील 66 हजार रुपये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय मानला जातो. येथे आपल्याला चांगले उत्पन्न देखील मिळते.

आज, आपण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेबद्दल जाणून घेऊयात जिथे आपल्याला वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि त्यावरून तुम्हाला मासिक व्याज उत्पन्न मिळेल.

यात इंडिविजुअल कंट्रीब्यूटर साडेचार लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. संयुक्त खात्यात 9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. आपले पैसे पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित आहेत. सरकार तुमच्या पैशांची गॅरंटी देते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे.

गुंतवणूक मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ते बाजारपेठेच्या जोखमीपासून पूर्णपणे मुक्त आहे आणि आपल्याला मासिक व्याज मिळते. पूर्णपणे रिटर्न गॅरंटी आहे.

10 वर्षांहून अधिक जे आपले वय असेल तर या योजनेचा फायदा घेतला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत किमान 1 हजार रुपये व जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकीची रक्कम 100 च्या मल्टीपल असणे आवश्यक आहे.

2 लाख गुंतवणूकीवर तुम्हाला 66000 रुपये मिळतील :- या योजनेत गुंतवणूकीसाठी सिंपल इंट्रेस्ट कैलकुलेशन केले जाते. जर आपण 1 लाख रुपये गुंतविले तर तुम्हाला एका वर्षामध्ये 6600 रुपये आणि दरमहा 550 रुपये मिळतील.

ते पाच वर्ष दरमहा भेटत राहतील. 2 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 1100 रुपये महिन्याला एका वर्षात 13200 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 66000 रुपये मिळतील. 3 लाख गुंतवणूकीसाठी तुम्हाला 1650 रुपये मंथली,

4 लाखांच्या गुंतवणूकीवर तुम्हाला 2200 रुपये मंथली आणि साडेचार लाख रुपये गुंतवणूकीवर 2475 रुपये मंथली मिळतील. एका वर्षात त्याला 29700 रुपये आणि पाच वर्षांत 1 लाख 48 हजार 500 रुपये मिळतील.

आपण 5 वर्षांपूर्वी पैसे काढून घेतल्यास डिडक्शन कट केले जाईल :- या योजनेत गुंतवणूक केल्यावर 1 वर्षापूर्वी ठेवींमधून पैसे काढता येणार नाहीत.

जर एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक मागे घेतली गेली तर 2% कपात केली जाईल. तीन वर्षानंतर आणि पाच वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास 1 टक्के डिडक्शन चार्ज कट होईल.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24